अर्थ : ओळखण्याची क्रिया.
उदाहरणे :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
समानार्थी : ओळख
अर्थ : प्रत्ययाला येणारी गोष्ट अमुकच आहे असे जाणणे.
उदाहरणे :
मी त्यांना आधिपासूनच ओळखत होते.
ते खरे आहे का खोटे हे कसे ओळखावे?
अर्थ : एखाद्या गोष्टीतील फरक समजणे.
उदाहरणे :
बरोबर आणि चूकीच्या गोष्टी ओळख.
अर्थ : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे.
उदाहरणे :
मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.